भजनी मालिका
← भजनांकडे परत

गायी चालिल्या वनाप्रती । सवें पेंधा चाले सांगाती

gayi chalilya vanaprati | saven pendha chale sangati

गायी चालिल्या वनाप्रती । सवें पेंधा चाले सांगाती ॥१॥ वळि गोवळिया कान्होबा । यमुने पाण्या नेई तूं बा ॥ध्रु०॥ पावया छंदे परतल्या गाई । विसरल्या चारा तल्लीन ठायीं ॥२॥ ज्ञानदेव सवें सवंगडा लाठा । गाई हांकितो गोठणा तटा ॥३॥