भजनी मालिका
← भजनांकडे परत

गयनी गव्हार कृपेचा उद्धार

gayani gavhar krupecha uddhar

गयनी गव्हार कृपेचा उद्धार । वरुषला उदार अमृतमय ॥ १ ॥ तोंची बोध साचा मुक्ताईसी लाटा । चालिले वैकुंठा समारंबें ॥ २ ॥ कुंचे गरुडटके टाळ श्रुति हरि । चालिलें गजरीं हरिसंगे ॥ ३ ॥ निवृत्ति वैष्णव सोपान खेचर । करिताती गजर हरिनामें ॥ ४ ॥