भजनी मालिका
← भजनांकडे परत

गरुड हनुमंत मुक्ताई सोपान । देव साधुजन आनंदले

garud hanumant muktai sopan | dev sadhujan anandale

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गरुड हनुमंत मुक्ताई सोपान । देव साधुजन आनंदले ॥१॥ मागें पुढें संत पताकांचे भार । मध्यें ज्ञानेश्वर मिरवतो ॥२॥ टाळ आणि विणे मृदंग गायन । करिती कीर्तन सुस्वरेंसी ॥३॥ जयजयकार ध्वनि करिती सुरगण । वर्षती सुमन स्वर्गींहुनी ॥४॥ हरिपाठ गजन करिती अपार । नामा म्हणे भार उठविले ॥५॥