भजनी मालिका
← भजनांकडे परत

गनीं वोळलें येतें तें देखिलें

ganin volalen yeten ten dekhilen

गनीं वोळलें येतें तें देखिलें । दर्पणीं पाहिलें बिंबलेपण ॥ १ ॥ तें रूप सुरूप सुरूपाचा विलास । नामरूपी वेष कृष्ण ऐसे ॥ २ ॥ सांडुनी धिटिंव जालासे राजीव । सर्वत्र अवेव ब्रह्मपणें ॥ ३ ॥ निवृत्ति घडुला सर्वत्र बिंबला । दर्पण विराला आत्मबोधीं ॥ ४ ॥