भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाणीं मी गाईलों भाटीं वाखाणिलों । जन्मोनियां जालों दास तुझा

ganin mi gailon bhatin vakhanilon | janmoniyan jalon das tujha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गाणीं मी गाईलों भाटीं वाखाणिलों । जन्मोनियां जालों दास तुझा ॥१॥ आतां माझी लाज राखें नारायणा । झणीं केविलवाणा दिसों देसी ॥२॥ माये दुर्‍हाविलों मोहें मोकलिलों । सोये पैं चुकलों संसाराची ॥३॥ आपवर्गिं सांडिलों प्रवृत्ती दंडिलों । मीपना मुकलों मायबापा ॥५॥ नामा म्हणे तुझ्या चरणाची आवडी । लागली न सोडी चित्त माझें ॥६॥