भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाणें गाती रे सुगडें । तया हांसति दुधडें

ganen gati re sugaden | taya hansati dudhaden

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गाणें गाती रे सुगडें । तया हांसति दुधडें ॥१॥ नाम गोड नाम गोड । होय जन्माचा निवाड ॥२॥ हांसे त्यासी हांसूं द्यावें । गात आपण असावें ॥३॥ नामा म्हणे जे हांसती । त्यांचीं कुळें नरका जाती ॥४॥