भजनी मालिका
← भजनांकडे परत

गगनीं उन्मनी वेदासी पडे मौनी

gaganin unmani vedasi pade mauni

गगनीं उन्मनी वेदासी पडे मौनी । श्रुतीची काहणी अरुती ठाके ॥ १ ॥ तें ब्रह्म साबडे नंदाचिये घरीं । वनी गाई चारी गोपवेषें ॥ २ ॥ न पाहातां होय ब्रह्मांड पीठिका । ते युग क्षणिका हारपे रया ॥ ३ ॥ निवृत्तिदैवत कृष्ण परिपूर्ण । सर्वत्र जीवन सर्वीं वसे ॥ ४ ॥