भजनी मालिका
← भजनांकडे परत

गगनाचिये खोपे कडवसा लोपे

gaganachiye khope kadavasa lope

गगनाचिये खोपे कडवसा लोपे । क्षरोनियां दीपें दृश्यद्रष्टा ॥ १ ॥ तें वोळलें गोकुळीं वसुदेवकुळीं । पूर्णता गोपाळीं गोपीरंगी ॥ २ ॥ जिवशिवसीमा नाहीं जेथें उपमा । हारपे निरोपमा तया माजी ॥ ३ ॥ निवृत्ति तत्पर वेदांचा ॐकार । ॐतत्सदाकार कृष्णरूपें ॥ ४ ॥