भजनी मालिका
← भजनांकडे परत

गगन ग्रास घोटीं ब्रह्मांड हें पोटीं

gagan gras ghotin brahmand hen potin

गगन ग्रास घोटीं ब्रह्मांड हें पोटीं । चैतन्याची सृष्टि आपण हरि ॥ १ ॥ देखिलागे माये सुंदर जगजेठी । नंदयशोदेदृष्टी ब्रह्म खेळे ॥ २ ॥ आकाश सौरस तत्त्व समरस । तो हा ह्रषिकेश गोपीसंगें ॥ ३ ॥ निवृत्ति साधन निरालंबीं ध्यान । तोचि हा श्रीकृष्ण ध्यान माझें ॥ ४ ॥