भजनी मालिका
← भजनांकडे परत

गगन घोटींत उठि पृथ्वी सगळी दाटी

gagan ghotint uthi pruthvi sagali dati

गगन घोटींत उठि पृथ्वी सगळी दाटी । आपणचि पाठी कूर्म जाणा ॥१॥ कांसवितुसार अमृत सधर । भक्त पारावार तारियेले ॥२॥ उचलिती ढिसाळ सर्व हा गोपाळ । तो यशोदेचा बाळ नंदाघरीं ॥३॥ निवृत्ति सादर हरिरूप श्रीधर । आपण चराचर विस्तारला ॥४॥