भजनी मालिका
← भजनांकडे परत

गगन घांस घोंटी सर्व ब्रह्मांडें पोटीं

gagan ghans ghonti sarva brahmanden potin

गगन घांस घोंटी सर्व ब्रह्मांडें पोटीं । निमुनियां शेवटीं निरालंबीं ॥ १ ॥ तें ब्रह्म सांवळें माजि लाडेंकोडें । यशोदेमायेपुढें खेळतसे ॥ २ ॥ ब्रह्मांडाच्या कोटी तरंगता उठी । आप आपासाठीं होत जात ॥ ३ ॥ निवृत्तिचें ध्यान यशोदेचें धन । वासुदेवखुण आम्हांमाजी ॥ ४ ॥