भजनी मालिका
← भजनांकडे परत

गडी आणि रमापती । तेव्हां आनंदें जेविती

gadi ani ramapati | tevhan ananden jeviti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गडी आणि रमापती । तेव्हां आनंदें जेविती ॥१॥ कोणी मांडिताती पानें । वरी ठेविताती अन्नें ॥२॥ कोणी ठेवी मांडीवरी । कोणी जेवी भूमीवरी ॥३॥ कोणी पसरिती चवाळें । कोणी अंथरती जाळें ॥४॥ गोळे घेऊनियां हातीं । येरयेरातें हाणीती ॥५॥ पाहाताती देव । धन्य धन्य त्यांचा भाव ॥६॥ मिटकीया देती । देवा वांकुल्या दाविती ॥७॥ माया मोही ब्रह्मादिका । नामा ह्मणे तोचि एका ॥८॥