भजनी मालिका
← भजनांकडे परत

गडयानों राजा कीरे झाला । कृष्ण सिंहासनीं बैसला

gadayanon raja kire jhala | krushna sinhasanin baisala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
गडयानों राजा कीरे झाला । कृष्ण सिंहासनीं बैसला ॥१॥ पांवा मोहरी घोंगडी । आम्हीं खेळु यमुने तटीं । नाचा पाउला देहुडी । कृष्ण आमुचा किरे गडी ॥२॥ खेळूं हुतुतु हुंबरी । थडक हाणो टीरीवरी । आतां चालिला दळभारी । आमचे यशो-देचा हरी ॥३॥ कुस्ती खेळतां कासाविसी । शेंबुड खरकटें नाकासी । कडे घेऊं सावकासी । आतां बहु भितो यासी ॥४॥ आम्ही तुम्ही सवें जाऊं । गाई वळावया जाऊं । त्याचे मानेंत बुक्या देऊं । जवळीं जावयासी भिऊं ॥५॥ नामा म्हणे चला जाऊं । हात जोडोनी उभे राहूं । पाया पडून मागून घेऊं । जनींवनीं तोचि कृष्णजी ध्याऊं ॥६॥