भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकीं एकपणा ठाव । नसोनि झाला सर्वा सर्व

ekin ekapana thav | nasoni jhala sarva sarva

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एकीं एकपणा ठाव । नसोनि झाला सर्वा सर्व ॥१॥ जैसें गगन घटीं मठीं । दिसोन आपण आपल्या पोटीं ॥२॥ येणें होणें नाणीं मनें । आपींआप संचलेपणें ॥३॥ निळा म्हणे याची कळा । नेणे हाहि न देखे डोळां ॥४॥