भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकी म्हणे भाव धरुं नेदी मौन । तेथींचे वो ज्ञान मज सांगे

eki mhane bhav dharun nedi maun | tethinche vo dnyan maj sange

एकी म्हणे भाव धरुं नेदी मौन । तेथींचे वो ज्ञान मज सांगे ॥१॥ एकीनें सांगितलें दुजीनें परिसलें । प्रपंचा पुसलें तेणें रुपें ॥२॥ तें घरटीं कडी सोकरी बागडी । सोहं कथा उघडी पंढरीये ॥३॥ ज्ञानदेव म्हणे निवृत्तीस मनें । नयनांसी पारणें देखतांची ॥४॥