भजनी मालिका
← भजनांकडे परत

एके दिवशीं न्हावयास पाणी नव्हतें विसणास

eke divashin nhavayas pani navhaten visanas

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
एके दिवशीं न्हावयास पाणी नव्हतें विसणास ॥१॥ देव धांवोनियां आले। शीतळ उदक घे घे बोले ॥२॥ आपुल्या हातें विसणी घाली जनीच्या डोयीं पाणी ॥३॥ माझ्या डोईच्या केसांस न्हाणें नव्हतें फार दिवस ॥४॥ तेणें मुरडी केसांस । कां म्हणे उगीच बैस ॥५॥ आपुल्या हातें वेणी घाली । जनी म्हणे माय झाली ॥६॥