भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकाहुनी आगळे एक । झाले हरिभक्त अनेक

ekahuni agale ek | jhale haribhakta anek

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एकाहुनी आगळे एक । झाले हरिभक्त अनेक ॥१॥ भक्ती निजज्ञानें वैराग्यें । देवचि होऊनी ठेले अंगे ॥२॥ प्रेमभक्ति अनुसरले । विठ्ठल देवें ते पूजिले ॥३॥ निळा म्हणे सांगों किती । न पुरे अल्प माझी मती ॥४॥