भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका नामें बहुत तरले । एका भावें जे अनुसरले । एका तुमतेचि ते पावले । एकाएकीं गोविंदा

eka namen bahut tarale | eka bhaven je anusarale | eka tumatechi te pavale | ekaekin govinda

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एका नामें बहुत तरले । एका भावें जे अनुसरले । एका तुमतेचि ते पावले । एकाएकीं गोविंदा ॥१॥ एका जाणोनियां तुमतें । एका रुसले अहंकारातें । एका विसरोनियां संसारातें । एका सुखातें पावले ॥२॥ एका तुमच्या निजध्यासें । एकाचि तुमच्या नामघोषें । एका तुमच्या कृपालेशें । आपणा ऐसे तुम्ही केलें ॥३॥ एका तुमच्या कीर्तनमेळें । एका तुमच्या भावबळें । एकाएकींचि उठोनि पळे पाप सगळें गोविंदा ॥४॥ निळा म्हणे एकाएकीं । स्मरणमात्रेंचि झाले सुखी । एका नामोच्चारें मुखीं । वैकुंठलोकीं बैसविलें ॥५॥