भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका एक गुज बोलतों निर्वाण

eka ek guj bolaton nirvan

एका एक गुज बोलतों निर्वाण । निवृत्ति चरण आठऊनी ॥१॥ अर्धमात्राक्षरीं अक्षरें पाहाती । अनाक्षरा परती बाईयानो ॥२॥ रज तम सत्त्व याहुनी निराळी । लक्षाही वेगळी निवृत्ति जाणे ॥३॥ ध्येय ध्याता ध्यान परता जिचा खेळ । ज्ञेय ज्ञाता ज्ञान याची साक्ष ॥४॥ सतचितआनंद ब्रह्मा हरी हर । तेही जिचा पार नेणविती ॥५॥ सलोकता मुक्ती आदी तिन्ही वर । वसतें जें घर योगीयांचें ॥६॥ त्त्वंपद तत्पद असिपदाचा रंग । त्याचा अंतरंग देखा बाईयानो ॥७॥ निवृत्ति सोपान मुक्ताबाईची खुण । ज्ञानदेव साधन बोलीले हे ॥८॥