भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक एकादशी होय पंढरीसी । सुकृताच्या रासी ब्रह्मा नेणे

ek ekadashi hoy pandharisi | sukrutachya rasi brahma nene

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एक एकादशी होय पंढरीसी । सुकृताच्या रासी ब्रह्मा नेणे ॥१॥ चंद्रभाबेतीरीं चतुर्भुज नरनारी । विठ्ठल कैवारी उभा असे ॥२॥ परतून येथें न येसी मागुता । आणिकां सर्वथा ऐसें नाहीं ॥३॥ क्षीरसागरींचें जिव्हार वैकुंठीचें सार । पुंडलिकें उपकार केला लोकां ॥४॥ नामा म्हणे आम्हां थोर लाभ झाला । तापत्रय गेला पांडुरंगा ॥५॥