भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक एका अवलोकिती । एक मिसळती एकांत

ek eka avalokiti | ek misalati ekant

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एक एका अवलोकिती । एक मिसळती एकांत ॥१॥ संत तेचि झाले देव । संती देव विराजे ॥२॥ येरयेरां मिठी पडे । आतां निवडे तें कैसें ॥३॥ निळा म्हणे भक्ति सुखें । झाले सारखे उभयतां ॥४॥