भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक अंजनीं उत्पन्न । एका खांबीं अवतरण

ek anjanin utpanna | eka khambin avataran

रचनाकार: संत नामदेव · अभंग
एक अंजनीं उत्पन्न । एका खांबीं अवतरण ॥१॥ ते पावले दोघे जण । नरसिंह हनुमंत आपण ॥२॥ एक सिंहनाद करी । एक भुभु:कार करी ॥३॥ एक सीताशुद्धी करी । एक प्रर्‍हादा कैवारी ॥४॥ एक बाळब्रह्मचारी । एक अर्धांगीं सुंदरी ॥५॥ एक रुद्रचा अवतारु । दुसरा नामया दातारू ॥६॥