भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्विज म्हणे जातां मनीं । कैसा भेटे चक्रपाणी

dvij mhane jatan manin | kaisa bhete chakrapani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
द्विज म्हणे जातां मनीं । कैसा भेटे चक्रपाणी ॥१॥ काय होईल न कळे । म्हणोनि ह्रदयीं कळवळे ॥२॥ येवढा ज्याचा राज्यभार । मी तो केवळ फकीर ॥३॥ कोठें तयाला आठव । बाळपणींचें माझें नांव ॥४॥ तैं तो होता गौळ्याघरीं । आतां त्रैलो. क्याधिकारी ॥५॥ नामा म्हणे ऐसें । करितचि निजध्यास ॥६॥