भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुरोनि ओळंगिल्या अविनाश देताहे । तो जवळी जातां काय देईल नेणों

duroni olangilya avinash detahe | to javali jatan kay deil nenon

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दुरोनि ओळंगिल्या अविनाश देताहे । तो जवळी जातां काय देईल नेणों ॥१॥ ऐसा तूं कृपाळु लक्षुमीचा कांत । सांडूनि होतात कष्टी झणीं ॥२॥ सेवा माझा स्वामि वैकुंठनायक । भुक्ति – मुक्तिनायक पांडुरंग ॥३॥ साधिलें नगर देऊनियां शिर । कष्ट दश-शिरें एवढे केले ॥४॥ तें दिलें बिभिषणा एका नमस्कारा । त्या माझ्या उदारा कां न भजा ॥५॥ मांडीवरी बैसों नेदी सापत्न माता । ह्मणे राजसुता नव्हसी तूं ॥६॥ हें ऐकोनी वना जाय तो तत्त्वता । स-कळ देवा माथां वरिष्ठ केला ॥७॥ दुर्योधनें भोजना बहु केले सायास । परि न घे ग्रास तया घरीं ॥८॥ विदुराचे घरीं न पुसतां जाय । भक्ति प्रीय होय स्वामि माझा ॥९॥ अर्जुनाचे काजीं सांडी निज पैजा । सु-दर्शना वोजा धरियेलें ॥१०॥ आपण लटिका झाला भीष्म साच केला । काळाचा अभुला स्वामि माझा ॥११॥ दीक्षित अवदान देती निज करीं । परि मुख न करी तयांकडे ॥१२॥ सुदाम्याचे पोहे देखे दृष्टिभरी । तयासी श्रीहरी पसरी हात ॥१३॥ ह्मणूनि हा गावा ह्मणूनियां ध्यावा । तोचि आराधाचा ह्लदयकमळीं ॥१४॥ हरिगुण नाम हेंचि प्रिय आह्मां । कीर्ति गाय नामा होऊनि भाट ॥१५॥