भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुरोनि देखिलें द्वारकानगर । अवघॆं कनकाकार वितिवेले

duroni dekhilen dvarakanagar | avaghen kanakakar vitivele

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दुरोनि देखिलें द्वारकानगर । अवघॆं कनकाकार वितिवेले ॥१॥ येथें देवराणा नांदतो तो ठाव । काय म्यां वर्णावें मंदमति ॥२॥ हिरे चिरे रत्न झगमग दिसती । घोंस ते लोंबती मोतियांचे ॥३॥ वैकुंठींचें सर्व वैभव आणिलें । शोभेसी शोभले आपोआप ॥४॥ गुडीया गोपुरें झळकती पताका । वाजतहि डंका चौवेदांचा ॥५॥ साहाजण भाट उभे महाद्वारीं । अठरा वारकरी मोकाशांचे ॥६॥ नामा म्हणे रिद्धिसिद्धीचें भांडार । देखिलें नगर ब्राम्हणानें ॥७॥