भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुरी ठेलीं कर्माकर्मे । तुमच्‍या धर्मे विठोबा

duri thelin karmakarme | tumach‍ya dharme vithoba

रचनाकार: संत निळोबा · अभंग
दुरी ठेलीं कर्माकर्मे । तुमच्‍या धर्मे विठोबा ॥१॥ आळवितां मुखीं नाम । सकळही काम परिपूर्ण ॥२॥ होतें संचित जोडलें कांहीं । ठेविलें पायीं तुमचे तें ॥३॥ निळा म्हणे माझें मज । वाटे गुज आतुडलें ॥४॥