भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुरी फांकला हा श्रीहरी । ब्रम्हया जाणवलें अंतरी । मग धांवोनि झडकरी । वत्सें गोवळें उचलिली

duri phankala ha shrihari | bramhaya janavalen antari | mag dhanvoni jhadakari | vatsen govalen uchalili

रचनाकार: संत निळोबा · अभंग
दुरी फांकला हा श्रीहरी । ब्रम्हया जाणवलें अंतरी । मग धांवोनि झडकरी । वत्सें गोवळें उचलिली ॥१॥ ते तों होती समाधिस्थ । ब्रम्हा नेतो हे नेणतीची मात । मग ते नेऊनियां समस्त । सस्यलोकीं बैसविलर ॥२॥ यरवरी येऊनियां श्रीरंग । पाहे तंव न दिसे संग । भलें झालें म्हणतुसे मग । अवघे आपणचि हो सरला ॥३॥ ब्रम्हा आडवूं पाहे मज । तरी मी सांडीन त्याची पैज । ऐसें म्हणोनियां श्रीराज । वैष्णवी माया विस्तारिली ॥४॥ आपण वस्तें आपण गोवळ । मोह्या पावे घोंगडी सकळ । काठया पवे पाईतणें मेळ । झाला ते केवळ एकला एक ॥५॥ लुडे खुडे मुडके कान । गोरे सांवळे राजीवनयन । बोलिले तोतिरे म्लान वदन । दैदिप्यमान तोहि झाला ॥६॥ निळा म्हणे होतें तैसें । होऊनी ठेला तेवढेंचि जैसें । नव्हती पहिले कोणी ऐसें । ओळखेंचि नेणती अवलोकिंता ॥७॥