भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृश्यादृश्य नातळे स्थूळ प्रपंचभान

drushyadrushya natale sthul prapanchabhan

दृश्यादृश्य नातळे स्थूळ प्रपंचभान । तेथें मायेचें कारण हेत नाहीं ॥ म्हणोनि ज्ञानविज्ञान कल्पना लक्षण । तेथें सुखासि सुख जाण भोगिताहे ॥१॥ नामावांचुनि संवादे निवृत्ति अभेदपदें । निज भजनीं स्वानंदें नवल पाहे ॥२॥ तेथें दिवस ना रात्री सर्वहेतुविवर्जितु । स्वयंभासक तूं नवल त्यांचें ॥ चिन्मय ना चिन्मात्र वेद्य सर्वगत । स्वसंवेद्य साक्षभूत । आपणवासीं ॥४॥ स्वसंवेद्य सन्मुखता भेदु नाहीं आतां । भक्ति आणि परमार्था हेंचि रुप ॥५॥ निवृत्तिप्रसादें संपर्केसि बोध । नीत नवा आनंद ज्ञानदेवा ॥६॥