भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृष्टीचें गुज संच्चिदानंद सहज

drushtichen guj sanchchidanand sahaj

दृष्टीचें गुज संच्चिदानंद सहज । तें चक्षूच्या अंतर निज निरोपिलें वो माये ॥१॥ अनुवादु खुंटला एकपणें एकला । संबंधु तुटला मागिलाचा वो माय ॥२॥ पुरती दृष्टी पूर्ण ब्रह्मींच भासली । त्या सुखा दोंदुलीं वाढलीवो माय ॥३॥ अवलोकितां न अवलोकवे बोलिजे तैसा नव्हे । हा रखुमादेविवरु भावें माथिला वो माय ॥४॥