भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृष्टीचें देखणें तेचि रूपमाया । शब्द बोलावया ज्ञान झालें

drushtichen dekhanen techi rupamaya | shabda bolavaya dnyan jhalen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दृष्टीचें देखणें तेचि रूपमाया । शब्द बोलावया ज्ञान झालें ॥१॥ ज्ञानांची जी जागा ह्लदयीं पाहावी । सत्रावीसी दावी खेळ तेथें ॥२॥ सत्रावी जीवन माया तिचे पोटीं । ज्ञान झाली दृष्टि देखावया ॥३॥ देखणें सिद्धांत बोलणें वेदांत । शब्द तोचि हेत सत्रावीचा ॥४॥ नाद आणि भेद देखणेम सिद्धांत । बोलणें वेदांत हेंचि दोनी ॥५॥ हेत तो अहंकार दोहीतें नाचवी । अविद्येसी दावी निजसुरा ॥६॥ नामा ह्मणे सिद्ध देखणें हा जन्म । डोळ्या माजीं वर्म बोलिलें तें ॥७॥