भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृष्टि उघडुनि नामा भोंवती जंव पाहे । तंव पुढें माय देखियेली

drushti ughaduni nama bhonvati janv pahe | tanv pudhen may dekhiyeli

रचनाकार: संत नामदेव · अभंग
दृष्टि उघडुनि नामा भोंवती जंव पाहे । तंव पुढें माय देखियेली ॥१॥ म्हणे मजशीं नाम्या वैर कां साधिलें । बहुत दुःख जालें कोणा सांगों ॥२॥ भक्तजनवत्सला परियेसी केशवा । भेटवी केधवां पूर्वस्थिती ॥३॥ भोजना बैसले जेवीं क्षुधाक्रांत । न कोणाशीं माता न बोले कांहीं ॥४॥ तें बळें उठविलें नव्हतां पैं तृप्ती । तैसी दुःखप्राप्ति जाली मज ॥५॥ पूर्ण पान्हा धेनु यांतला वोरसे । वत्स थोर हर्षें पान करी ॥६॥ तें धनियें देखोनि बळें आसुंडलें । तळमळित ठेले थोर आशा ॥७॥ कृपणें संपत्ति जोडिली सायासें । तळमळी ते कैसें नेलियातें ॥८॥ तैसी परी मज जाहली गा देवा । परियेसी केशवा मायबापा ॥९॥ दुःखाचे सागरी पडिलों गा श्रीहरि । सुखरूप मुरारी निववी मातें ॥१०॥ नामा म्हणे विठो कृपेचा सागरु । करावा अंगिकार अनाथाचा ॥११॥