भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृढ विश्वासें हरिसी भजतां सायुज्यता पावले

drudh vishvasen harisi bhajatan sayujyata pavale

रचनाकार: संत निळोबा · अभंग
दृढ विश्वासें हरिसी भजतां सायुज्यता पावले ॥१॥ ऐसे भक्त नेणों किती । झाले वानिती पुराणें ॥२॥ जिहीं केलें पिंडदान । पदीं मन प्राणेंसी ॥३॥ निळा म्हणे त्यांची कीर्ति । संतहि गाती कीर्तनीं ॥४॥