भजनी मालिका
← भजनांकडे परत

दृढ होतां अनुसंधान

drudh hotan anusandhan

रचनाकार: संत रामदास · अभंग
दृढ होतां अनुसंधान । मन जाहलें उन्मन पाहों जातां माया नासे । द्वैत गेलें अनायासें होतां बोधाचा प्रबोध । जाला शब्दाचा नि:शब्द ज्ञान विज्ञान जाहलें । वृत्ति निवृत्ति पाहिलें ध्यानधारणेची बुध्दि । जाली सहजसमाधि रामरामदासी वाच्य । पुढें जालें अनिर्वाच्य।