भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारीं जाईन मी

doicha padar ala khandyavari | bharalya bajarin jain mi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारीं जाईन मी ॥१॥ हातीं घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आतां मज मना कोण करी ॥२॥ पंढरीच्या पेठे मांडियेले पाल । मनगटावर तेल घाला तुम्ही ॥३॥ जनी म्हणे देवा मी झालें येसवा । निघालें केशवा घर तुझें ॥४॥