भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी

doicha padar ala khandyavari bharalya bajari jain mi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी ॥ १॥ हातीं घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आतां मज मना कोण करी ।।२।। पंढरिच्या पेठें मांडियेलें पाल। मनगटावर तेल घाला तुम्ही ||३|| जनी म्हणे देवा, मी झालें वेसवा रिघालें केशवा घर तुझें ॥४॥