भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोहामाजीं वास होता बहुत दिवस । आतां कासा-वीस काय सांगूं

dohamajin vas hota bahut divas | atan kasa-vis kay sangun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
डोहामाजीं वास होता बहुत दिवस । आतां कासा-वीस काय सांगूं ॥१॥ विक्राळ होऊनि आला चक्रपानी । काळिया निर्वाणीं ध्यान करी ॥२॥ नको काढूं मज उदका बाहेरी । दंडवत करी काळिया तो ॥३॥ नामा ह्मणे ऐसा काढिला विखरी । कीर्ति वानूं तरी किती देवा ॥४॥