भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानोबाचा हात । प्रेमें धरी विश्वनाथ

dnyanobacha hat | premen dhari vishvanath

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानोबाचा हात । प्रेमें धरी विश्वनाथ ॥१॥ ऐसें बोलत चालत । दोघे आले गंगे आंत ॥२॥ ज्ञानोबाचें पायीं । मिठी घाली गंगाबाई ॥३॥ नामा म्हणे सोडा बाई । ज्ञानदेव सर्वांठायीं ॥४॥