भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानेश्वरापाशीं आनंदी आनंद । नाचतो गोविंद कीर्तनासी

dnyaneshvarapashin anandi anand | nachato govind kirtanasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानेश्वरापाशीं आनंदी आनंद । नाचतो गोविंद कीर्तनासी ॥१॥ दशमीच्या दिवशीं महोत्सव आळंकापुरीं । करितसे हरि आवडीनें ॥२॥ हरिदिनीं जागरण होत सारी रात्र । बसोनि पंढरीनाथ स्वयें अंगे ॥३॥ द्वादशी पुण्यतिथी केली ज्ञानेश्वरा । पांच दिवस सारा महोत्सव ॥४॥ अमावस्ये दिवशीं केला गोपाळकाला । मग वैष्णवाला लाभ मोठा ॥५॥ नामा म्हणे देवा आनंद आळंकापुरी । कांही दिवस हरि राहा येथें ॥६॥