भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानेश्वर तुम्हीं निरविलें सोपान । केली बोळवण पांडुरंगा

dnyaneshvar tumhin niravilen sopan | keli bolavan panduranga

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानेश्वर तुम्हीं निरविलें सोपान । केली बोळवण पांडुरंगा ॥१॥ तो आम्ही उत्सव पाहिलासे डोळां । चांगोबाचा सोहळा दाविला हरी ॥२॥ होती ऐसी नाहीं जाली मुक्ताई । संत तया ठायीं स्फुंदताती ॥३॥ रम्य स्थळ म्हणोनि राहिले एक मास । युगा ऐसे दिवस ऋमियेले ॥४॥ अर्ध मास वैशाख अर्ध मास ज्येष्ठ । फार होती कष्ट निवृत्तिराजा ॥५॥ मुक्ताई मुक्त केली केशवराजा । नामा म्हणे पूजा तापीतीरा ॥६॥