भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानेश्वर म्हणे नाम्यासवें जेविसीं नाहीं हृषीकेशी म्हणतसे

dnyaneshvar mhane namyasaven jevisin nahin hrushikeshi mhanatase

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ज्ञानेश्वर म्हणे नाम्यासवें जेविसीं नाहीं हृषीकेशी म्हणतसे ||१|| सांगितलें एक भलतेंचि बोलसी। आहे याचि प्रांति ज्ञानेश्वरा ||२|| बाहियेलें त्वरें ऐसें कांहीं काम उठे मेघश्याम तांतडीनें ॥ ३॥ निरोप देवोनि सांगावा एकांती म्हणे जनीप्रति पांडुरंग ॥४॥ देव म्हणे नाम्या ऐकायें वचन देई साधोन वेळ तुझी ॥५॥ जनी म्हणे आतां समजलें मज धरीन उमज येथोनियां ॥६॥