भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दां । चिदानंद बाबा लिही त्यांस

dnyaneshvar abhang bolile jya shabdan | chidanand baba lihi tyans

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दां । चिदानंद बाबा लिही त्यांस ॥१॥ निवृत्तीचे बोल लिहिले सोपानें । मुक्ताईचीं वचनें ज्ञानदेवें ॥२॥ चांगयाचा लिहिणार शामा तो कांसार । परमानंद खेचर लिहित होता ॥३॥ सांगे पूर्णानंद लिही परमानंद । भगवंत भेटी आनंद रामानंद ॥४॥ सांवत्या माळ्याचा काशिबा गुरव । कर्म्याचा वसुदेव काईत होता ॥५॥ चोखामेळ्याचा अनंतभट्‌ट अभ्यंग । म्हणोनी नामयाचे जनीचा पांडुरंग ॥६॥