भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानदेव म्हणे परियेसी विष्णुदासा । तूम सुखसंतोषा पात्र होसी

dnyanadev mhane pariyesi vishnudasa | tum sukhasantosha patra hosi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ज्ञानदेव म्हणे परियेसी विष्णुदासा । तूम सुखसंतोषा पात्र होसी ॥१॥ प्रेमाचा जिव्हाळा तुझ्या ह्रदयीम आला । तूं का वेळोवेळां खंती करिसी ॥२॥ विचारी सावध होवोनि भक्तराजा । सुखानंदु तुझा तुजची जवळी ॥३॥ मी नेणें ज्ञानगती नेणें योगयुक्ति । न देखें विश्रांति एकेविण ॥४॥ सर्वभावें मज तेंचि रुप आवडे । जें पुंडलिकापुढें उभें असे ॥५॥ तो माझा विठठल दावा दृष्टी भरी । आस मी न करी आणिकांची ॥६॥ व्यापकु विठ्ठलु आहे सर्व देशीं । जरी सांडोनियां पाहसी भेदभ्रमु ॥७॥ तो नाहीं ऐसा ठाव उरलासे कवण । सर्वत्र संपूर्ण गगन जैसें ॥८॥ काया वाचा मनें तोचि व्हावा । गीतीं गातां जीवा सुख वाटे ॥९॥ ऐकावा श्रवणीम पाहावा तोचि नयनीं । नवजावा जवळोनी दूर कोठें ॥१०॥ जें अक्षर अव्यक्त देशकाळरहित । ज्ञानी उपासित सोहंभावें ॥११॥ सर्वेद्रियांसहित आवरोनि चित्त । भोगिती अद्वैत नित्य सुख ॥१२॥ सर्व सुख मज आहे त्याच्या पायीं । आणिकांच्या वाहीं न पडे कदां ॥१३॥ तेथें माझें मन रंगलेंसें भावें । सुख येणें जीवें देखिलें डोळां ॥१४॥ सर्वगत संपूर्ण सर्वकाळ असणें । होणें आणि जाणें नाहीं जया ॥१५॥ तें तुज माझारीम तूं तयाभीतरीं । अनुभवी निर्धारी ठेवुनी मन ॥१६॥ मी न मनीं न मनीं लटिकी हे कहाणी । जळधरावांचोनि चातक जैसा ॥१७॥ तैसें माझें मन स्मरे रात्रदिवस । पंढरीनिवास जीवन माझें ॥१८॥ ऐसें ऐकोनि बोलणें म्हणे ज्ञानदेव । धन्य तुझा भाव एकविध ॥१९॥ नामा म्हणे माझ्या सुखाचा विसावा । आवडे या जीवा पंडरीरावो ॥२०॥