भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानाचें गरोदर वाढलें परपुरुषें

dnyanachen garodar vadhalen parapurushen

ज्ञानाचें गरोदर वाढलें परपुरुषें व्यभिचारिणीं ऐसें म्हणती लोक वो माय ॥१॥ नव्हे व्यभिचारिणी नाहीं मज कोणी । पाहतां निर्वाणी सहज जोडलें वो माय ॥२॥ निवृत्ति पुराडला देहेभाव चोखाळला । अंगेंसि मर्दिला ब्रह्मरसु वो माय ॥३॥ आतां उजरणी येई भ्रांती नलगे माझ्या चित्तीं । उजरणी सहजगती जाली वो माय ॥४॥ आतां असो हें बोलणें दुर्जना हें सांगणें । चिदानंदघन तेणें वाढ्लें वो माय ॥५॥ ऐसा देखणिया देखिला निजगुप्त प्रकाशला । तो रखुमादेविवरु मज फ़ावला वो माय ॥६॥