भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर

dnyanacha sagar | sakha majha dnyaneshvar

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥ मरोनियां जावें । बा माझ्याच्या पोटा यावें ॥२॥ ऐसें करी माझ्या भावा । सख्या माझ्या ज्ञानदेवा ॥३॥ जावें वोवाळुनी । जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥