भजनी मालिका
← भजनांकडे परत

ध्येय ध्यान मनीं उन्मनीं साधनीं

dhyey dhyan manin unmanin sadhanin

ध्येय ध्यान मनीं उन्मनीं साधनीं । लाविता निशाणी ध्यानमार्गे ॥ १ ॥ तें रूप सघन गुणागुणसंपन्न । ब्रह्म सनातन नांदे इटे ॥ २ ॥ विठ्ठलनामसार ऐसाचि निर्धार । मुक्ति पारावार तीं अक्षरीं ॥ ३ ॥ निवृत्ति निवांत राहिला निश्चित । केलेंसे मथीत पुंडलिकें ॥ ४ ॥