भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरुनियां श्वास पोटीं सेवो पहासी हाल । न पवसी स्थळ भोंवतां गडियांचा मेळ

dharuniyan shvas potin sevo pahasi hal | na pavasi sthal bhonvatan gadiyancha mel

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धरुनियां श्वास पोटीं सेवो पहासी हाल । न पवसी स्थळ भोंवतां गडियांचा मेळ ॥१॥ हुतुतु हुतुतु किती करिसी वेळोवेळां । होऊनियां नम्र भजे घननीळ सांवळा ॥२॥ धांवतां अविचारें पोरें धरिती टांगे । चलतां वळ मागें पडशील उगे ॥३॥ निळा म्हणे सांडूनियां हुतूतूचा बार । आठवी हा ध्यानीं मनीं नंदाचा कुमर ॥४॥