भजनी मालिका
← भजनांकडे परत

धराल जरी चित्तीं न लगेचि तरी वेळ । आहेती सकळ कळा हातीं

dharal jari chittin na lagechi tari vel | aheti sakal kala hatin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
धराल जरी चित्तीं न लगेचि तरी वेळ । आहेती सकळ कळा हातीं ॥१॥ क्षणेचि सगुण क्षणेंचि निर्गुण । क्षणेंचि प्रसन्न होतां दासा ॥२॥ क्षणेंचि निर्मिले चतुर्दशलोक । देव ब्रम्हादिक चौदा मनु ॥३॥ झकवाल तरी ठकडे देवा ब्रम्हांदिकां । भेटाल तरि भाविकां नलगे वेळ ॥४॥ ऐसे संत मुनी जाणती सकळ । क्रीडा तुमचा खेळ ठावा तयां ॥५॥ निळा म्हणे माझें अतरींचे आर्त । जाणतां सतत साक्ष तुम्ही ॥६॥