भजनी मालिका
← भजनांकडे परत

धरा सतराचा हो मेळा कारखाना झाला गोळा वाजविती आपुल्या कळा। प्रेमबळा आनंदें

dhara sataracha ho mela karakhana jhala gola vajaviti apulya kala| premabala ananden

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
धरा सतराचा हो मेळा कारखाना झाला गोळा वाजविती आपुल्या कळा। प्रेमबळा आनंदें ।।१।। झडतोनामाचाचौघडाब्रह्मीब्रह्मरूपीचाहुडासंतऐकतातीकोडांप्रेमबळाआनंदे||२|| नामां दामा दोनी कालू। नामा विठा दमामे पैलू चौघी सुना चारी हेलू । कडकडां बोल उमटती ॥३॥ गोंदा म्हादा करणी करी । नादें दुमदुमली पंढरी। आऊबाई तुतारी मंजुळ उमटती स्वरी ।।४।। गोणाबाईनोबतपल्ला । नादअंबरींकोंदलाराजाईझांजमंजुळबोला। मंजुळस्वरउमटला||५|| जनाबाई घड्याळ मोगरी । घटका भरतां टोला मारी काळ व्यर्थचि गेला तरी गजर आनंदें करी ॥६॥ १३५: विठोबा चला मंदिरांत गस्त हिंडती बाजारांत १॥ रांगोळी घातली गुलालाची रोज म्यां केली पुष्पांची ।।२।। समया जळती अर्थ रात्री गळ्यामध्ये माळ मोत्यांची ॥३॥ नामदेवाला सांपडलें माणिक घेतलें जनीनें हातांत ।।४।। घेउनी गेली राउळांत गस्त हिंडती हकिमाची बाजारांत ॥५॥