भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य कर्‍हेचे पाठारीं । इंद्रनीळ पर्वत महागिरी

dhanya kar‍heche patharin | indranil parvat mahagiri

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धन्य कर्‍हेचे पाठारीं । इंद्रनीळ पर्वत महागिरी । जैसें आळंकापुरीं । तैसें पुण्यक्षेत्र हें ॥१॥ ऐसें अनुमानिलें स्थळ । पूर्दापार निर्मळ । सिद्धी पाववी आळ । माय बापा ॥२॥ मग सुमूहूर्त अमृतयोग । सिद्धा संकेत ज्ञानमार्ग । पहिला चंद्र स्वांग । गमन केलें योगिराजें ॥३॥ निवृत्ति सोपान मुक्ताई । आळंकापुरीहुनी आले पाही । मृदंग वाजती घाई । कीर्तन नवाई काय सांगू ॥४॥ सामाधि सावधान । सुखी ज्ञानेश्वर निधान । जाला पां स्थिर सोपान । भेटीलागीं ॥५॥ केलें समाधिस नमन । विज्ञापिले सर्वजन । करा आमुची बोळवण । शेवटींची ॥६॥