भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य आमुचें भाग्य परब्रह्म संगें । साहित्य स्वआंगें करितसे

dhanya amuchen bhagya parabrahma sangen | sahitya svaangen karitase

रचनाकार: संत नामदेव · अभंग
धन्य आमुचें भाग्य परब्रह्म संगें । साहित्य स्वआंगें करितसे ॥१॥ नाशिवंत देह जाईल कीं अंतीं । नीचाची संगति कोण काज ॥२॥ पाहिला गे माय ब्रह्मींचा आवर्तु । जीव आणि जंतु विस्तारिले ॥३॥ निवृत्ति मुक्ताई केलासे विवेक । आपपरा लोक दुजें नाहीं ॥४॥ नामा म्हणे चित्त केलें स्थिर । देव ऋषीश्वर उठावले ॥५॥